Beed | विधान परिषद निवडणुकीत Pankaja Munde यांची उमेदवारी नाकारल्याने समर्थकांचा आक्रोश | Sakal
राज्यसभेनंतर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकी वेळीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारण्यात आली.ज्यामुळे त्यांच्या सर्मथकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. रविवारी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा बाह्यवळण रस्ता येथे समर्थकांनी घोषणाबाजी केली.रविवारी शहरात कार्यक्रमासाठी आलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्याला समर्थक आडवे गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन कार्यकर्त्यांना बाजूला केले.